Vision & Mission - Maharashtra Shikshan

Go to content
Our Mission & Vision

श्रीमती हर्षा बाळकृष्ण पिसाळ (निगडे)
महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती  सावित्रीबाई  राज्य गुणगाैरव
पुरस्कार प्राप्त शिक्षिका आपटे प्रशाला, पुणे





सर्वांना सस्नेह नमस्कार,
महाराष्ट्रामधील शिक्षण पद्धती ही दर्जेदार आहे.
अमृताहुनही गाेड आपली मराठी भाषा आहे. शिक्षण संक्रमण, जीवन शिक्षण ही मासिके परदेशात न्यूयाॅर्क, अटलांटिका येथील मराठी भाषा संवर्धन समितीकडे पाेहाेचत आहेत. एवढा माेठा महाराष्ट— असूनही केरळ सारखे छाेटे राज्य शिक्षणात पुढे का बरे गेले असेल? तेथील काेणत्या गाेष्टींचे आपल्याला अनुकरण करता येईल? काय आहे महाराष्ट्राच्या शिक्षणातील सध्याच्या अडचणी? त्या जाणून घेणे, त्यावर संशाेधन करणे आवश्यक आहे. आज दहा लाखांपेक्षा जास्त ऊस ताेड कामगार, आदिवासी, दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षण हे विकासाचे साधन आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षकांचे सबलीकरण करणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांना प्राेत्साहन देणे महत्त्वाचे वाटते.
ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पाेहाेचली पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून अनेक प्रयत्न हाेत असतात. शिक्षक, मुख्याध्यापक तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी अनेक एनजीओ, पालक विविध उपक्रमांमधून शिक्षणातील अडचणी साेडवत असतात.  गुणवत्ता वाढीसाठी ही प्रयत्नशील असतात. अशा उपक्रमांना प्रसिद्धी मिळाली तर शिक्षण क्षेत्रातील इतरांनाही प्राेत्साहन मिळेल आणि एकमेकांच्या अनुभवाचा, उपक्रमांचा उपयाेग करता येईल यासाठी ही शैक्षणिक चळवळ! सर्वांच्याच लेखांना प्रसिद्धी मिळू शकत नाही. त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व शिक्षण क्षेत्रासाठी खारीचा वाटा उचलता यावा या उद्देशाने आणि महाराष्ट— शासनाने क्रांतीज्याेती सावित्रीबाई राज्य गुणगाैरव पुरस्कार प्रदान केला; त्याचे उतराई व्हावे यासाठी ही सर्व धडपड!!
महाराष्ट— शिक्षण हा अंक सर्वांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी ताे ऑनलाइन प्रकाशित करण्याचा विचार जेव्हा मनात आला ताे दिवस हाेता एक मे 2024 महाराष्ट— दिन ! लेखकांना विविध शैक्षणिक विषय दिले. त्याचबराेबर त्यांनी केलेल्या व आवडीच्या विषयावरही लेखन, फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी आवाहन केले. सांगायला मला खूप आनंद वाटताेय की पहिल्या तीन दिवसांमध्येच 18 लेख प्राप्त झाले. माझा उत्साह अजून द्विगुणीत झाला लेखकांशी संपर्क करताना एकमेकांना प्राेत्साहन मिळाले. आनंददायी संवाद झाला. त्यांच्या सूचनांचे, मार्गदर्शनाचे स्वागत केले. अनेकांनी अंक हार्ड काॅपी स्वरूपात सुद्धा मिळावा अशी विनंती केली. या प्रामाणिक धडपडीत अनेकांचे सहकार्य व तज्ञांचे मार्गदर्शन, शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे आणखी ताकद वाढली. लेखकांना प्राेत्साहन देणारे श्री केदार महानंदा चिदानंद रामपुरे सरांचे विशेष आभार.

ADDRESS

373, Shaniwarpeth, Dhanlaxmi Complex, C-wing,
flat number 102, Pune 411030

Created
Back to content